वेदांचा तो वेद
जीवनाचा वेद
आयुष्याचा वेद
परमवेद आयुर्वेद !!
आरोग्य देवता भगवान धन्वंतरीच्या कृपा आशीर्वादाने आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने सत्तर वर्षांपूर्वी १९५२ सालच्या पाडव्यापासून सुरु झालेला आयुर्वेद सेवेचा प्रवास आज एका नवीन वळणावर येऊन पोहचला आहे. जेव्हा आयुर्वेदाबद्दल कोणाला फारशी माहिती नव्हती अशा काळात संपूर्ण आयुर्वेदिक औषधांचं स्वतंत्र दालन सुरु झाल्यावर आजच्या यशाच्या शिखरावर पोहोचले आहे.
गेल्या ७० वर्षात २०० पेक्षा जास्त कंपन्यांची, दहा हजारा पेक्षा जास्त प्रकारची उत्पादने पाच हजाराहून अधिक डॉक्टर वैद्य व औषध दुकानदार यांच्यामार्फत लाखो रुणापर्यंत पोहोचवून, आयुर्वेदाच्या सेवेमध्ये योगदान दिले आहे. नामांकित आयुर्वेदिक कंपन्यांकडून चांगल्या सेवेबद्दल वारंवार गौरव झाला आहे. नगर जिल्हा व आजूबाजूचा परिसर तसेच राज्यातल्या इतर भागातही मागणीनुसार यशस्वी तत्पर सेवा देत आहोत. अर्बन बँक रोड येथील श्री दत्त एजन्सीचे दालन तसेच सुरु ठेवून आपल्याला अधिक चांगली सेवा देण्यासाठी नवीन प्रशस्त जागेत श्री दत्त एजन्सी चे श्री दत्त आयुर्वेद प्रतिष्ठान हे विस्तारित दालन सुरु करत आहोत.
त्यानिमित्तने आपल्यासाठी ही उत्पादन पुस्तिका आपल्या अधिक माहितीसाठी आपल्या सेवेत देत आहोत, आपल्या अधिक चांगल्या सेवेसाठी नक्की संपर्क करा.
श्री. निलेश डफळ